⛰️🪻💕✨
बोलतो वारा फुलांशी
नवपर्वाची देतो चाहूल…
विश्वासाने घडतो पाया
निश्चयाचे पडते पाऊल…
रायगडीचा पाठीराखा
सह्याद्रीतील शिवलिंग…
लिंगाणाची सांगे ख्याती
सदैव साक्षी रायलिंग…
निर्धाराचा महामेरु
अढळ अबाधित राही…
जगण्याला योग्य दिशा
सह्याद्री सहवास देई…
– पूनम जगताप
©Poonam Jagtap
Video Player
00:00
00:00