शिक्षक दिन मराठी कविता | Teacher’s day Marathi Poem

शिक्षक दिन मराठी कविता | Teacher’s day Marathi Poem

शिकवण तुमची
येता कामी
संकटातूनी
तरतो नामी…
क्षमता जोखता
कष्ट वाढती
प्रगतीची मग
मिळते बढती…
कदर गुणांची
घडते जेथे
हिर्‍यास पैलू
पडतो तेथे…
दिव्यासम आयुष्य
उजळता किती
तेवत्या पणत्यांची
नाही गणती…
नजरेत आमुच्या
आदर सदा
उतराई ऋणातून
न होऊ कदा…
शब्दशुभेच्छा या
शुभदिनी तुम्हा
आशीर्वाद लाभो
सदैव आम्हा…
 —पूनम जगताप
©Poonam Jagtap
💐शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

 

Key words: शिक्षक दिन शुभेच्छा in मराठी, शिक्षक दिन कविता in मराठी,

6 thoughts on “शिक्षक दिन मराठी कविता | Teacher’s day Marathi Poem”

Leave a Comment