मनापासून पानापर्यंत मराठी कविता
कल्पना जन्मास येता
सृजनासी फुटती पंख…
उमटती पानावर शब्द
सोसलेल्या क्षणांचे डंख…
हर्षभरीत क्षणी उसळत्या
लाटांना ना दिसे अंत…
पाझरतो शब्दांतून तेव्हा
श्रृंगारसरींचा आसमंत…
भावभावनांचे बंध गुंफता
शब्दांचेही जुळते सख्य…
मनापासून पानापर्यंत येता
दिसे शब्दांचे भावांशी ऐक्य…
—पूनम जगताप
©Poonam Jagtap

Mast😊