जिव्हाळा मराठी कविता | Affection Marathi Poem

जिव्हाळा कविता मराठी |Affection poem marathi

चुकूनी दिशा हरवता
कासावीस जीव होई…
भरकटल्या लेकरासी
ती हंबरून हाक देई…
क्षणभर या विरहात
भांबावून दोघे जाता…
लेकरा शोधण्यासी
थके न ही गोमाता…
गाईस फुटे पान्हा
दृष्टीस पडता बाळ…
वासराला पाजताना
क्षण होई लडिवाळ…
नजरेत साठवावे
कोरावे हृदयी खोल…
शब्दांवीना ऐकलेले
माय लेकराचे बोल…
मातृत्वाची ही माया
ओलावा जपते कायम…
निस्वार्थ प्रेमाची रीत
झुकवीते सारे नियम…
प्रेमाचा उसळता सागर
अंकुराला पोसत राही…
त्याचा बहर पाहण्यासाठी
आयुष्यभर झिजते आई…
              —पूनम जगताप

4 thoughts on “जिव्हाळा मराठी कविता | Affection Marathi Poem”

Leave a Comment