मैत्री मराठी कविता | Friendship Marathi Poem
“मैत्री”…
शब्द एक छोटा
पण व्याप्ती मोठी…
अनोख्या नात्याचे
उपकार किती…
ना वयाचे बंधन
ना वर्णाची दरी…
मेळ विचारांचा
हीच ओळख खरी…
जणू नात्याचा श्वास
विश्वासाची हमी…
रक्ताच्या नात्याला
फिकं पाडणारं पाणी…
आधार देणं
तर कधी आधार घेणं…
स्वार्थ दुय्यम
आधी दुसर्याचं होणं…
हाकेला उभे
गरजेला हजर…
अशाश्वत गर्दीतील
शाश्वत नजर…
रखरखत्या दुनियेतील
कोवळे पान चैत्रीचे…
अखंड राहोत निरंतर
ऋणानुबंध मैत्रीचे…
— पूनम जगताप
©Poonam Jagtap

अप्रतीम काव्य मॅडम!👌👍
Nice