शेतकरी मराठी कविता | Farmer marathi poem

शेतकरी कविता मराठी | Marathi poem Farmer

शेतात आणि डोळ्यांत
पाण्याला सीमा नाही…
पीक झोपलयं फक्त
पण मनातील उमेद नाही…
अशा गोष्टी होत असतात
आणि त्या होतच राहणार…
निसर्गच आहे तो शेवटी
खऱ्याचीच परीक्षा पाहणार…
लहरीपणा त्याचाही
आपल्यालाच झेलावा लागेल…
मनाची तयारी असेल तर
दुःखाचे थोडक्यात भागेल…
येऊ देत वादळ वारा
तू फक्त जिद्द नको सोडू…
एकजुटीने परत फिरून
अशा संकटांना भिडू…
जगण्यासाठी जिवाची धडपड
चालू तर ठेवावी लागणारच…
संयम कितीही पाहू दे आता
उद्या सोन्याचा दिस दावणारच…
विश्वास मनीचा तुझ्या
दृढ आणि पक्का ठेव…
तुटून फिरून उभा राहणारा
तू खरा शेतकरी एकमेव…
— पूनम जगताप
©Poonam_jagtap
farmer poem in marathi
farmer poem in english
farmer poem in hindi
farmer poem in tamil
farmer poem in telugu
farmer poem in kannada
farmer poem for fun
farmer poem by Poonam Jagtap

Leave a Comment