निरोप सरत्या वर्षाला मराठी कविता | Good Bye to Last Year
वर्षे येतात, तशीच निघूनही जातात. पण हे २०२० मात्र आतापर्यन्त अनुभवलेल्या वर्षांपैकी खूप वेगळे ठरले. कधी विचार केला गेला नाही असे अनुभव देणारे आणि कधीही सहज विसरली जाणार नाही अशी शिकवणी देणारे सुद्धा… म्हणूनच थोडे व्यक्त व्हावेसे वाटले कारण हा क्षण पुन्हा येणे नाही आणि कदाचित असे वर्षही… उद्याचा सूर्य नवीन वर्षासाठी आशा, समृद्धी आणि आनंद देणारा असावा ही सरत्या वर्षाला निरोप देताना परमेश्वराचरणी प्रार्थना.
निरोपासोबत घेऊन सवे
गोड कडुश्या आठवणी…
अनुभव असा नको पुन्हा
या विनंतीसोबत पाठवणी…
म्हणायला एक वर्ष
पाहता पाहता सरलं…
अनुभवाचं गाठोडं
थोडं जास्तच भरलं…
संमिश्र भावनांचा
पाहिला जणू कल्लोळ…
काळाच्या ताकदीने
दाखवून दिला घोळ…
जाणिवांना पुन्हा नव्याने
दिसली समृद्धीची वाट…
हातात नसूनही असतंच
कर्तुत्वाचे भविष्य दाट…
कैक पैलूंनी दृष्टिकोन
प्रगल्भतेने व्यापला…
आयुष्याचा खेळापुढे
मार्ग विचारांचा दिपला…
जाताना थोडी आता
जा मनी आशा पेरून…
सकारात्मक ऊर्जा पुरो
नकारात्मकतेला उरून…
—पूनम जगताप
©Poonam_jagtap
खुप सुंदर
Jaberdast