गुरुपौर्णिमा मराठी कविता l Gurupournima Marathi Poem
असे नानापरि l
वाट दावी खरी l
तरावया ll
ज्ञानाची ज्योतिका l
पेटवी अंतरीl
उजळवी आयुष्य l
जगावया ll
काळाची भूमिका l
जरी सर्वश्रेष्ठ l
हरेक सजीव निर्जीव l
गुरुपदी ll
शिकवितो धडे l
आवर्जून सारे l
गुरुचे त्या स्थान l
मनी आधी ll
शिकताही येते l
निरीक्षणाच्या आधारेl
नजर एकलव्याची l
जो देई ll
चरणी तयांच्या l
असे माथा हा लिन l
जन्म हा आमुचा l
सार्थ होई ll
—पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam Jagtap
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा