माणूस मराठी कविता | Human Marathi Poem
निसर्गाची किमया l
उत्क्रांतीची माया l
मिळाली ही काया l
माणूस म्हणून ll
बुद्धिमत्ता अपार l
सुख संपत्तीचा पूर l
सत्ता सामर्थ्याचा जोर l
माणूस म्हणून ll
एकमेकांत भेदभाव l
पूजी दगडात देव l
जाणीव जगण्यात ठेव l
माणूस म्हणून ll
भूतदयेसी ओहोटी l
वृक्षसंहारे हातोटी l
सोड अहंवृत्ती खोटी l
माणूस म्हणून ll
गरीब श्रीमंतीची दरी l
ओळख दाखविते खरी l
दानशूर कोण परि l
माणूस म्हणून ll
गरजवंताला आधार l
मदतीला उदार l
मानवतेचा उद्धार l
माणूस म्हणून ll
नको क्रौर्याला थारा l
ना ही द्वेष मत्सराचा वारा l
जन्म एकमेकांसाठी सारा l
माणूस म्हणून ll
आयुष्याचा सातबारा l
सद् प्रवृत्तींनी भरा l
माणुसकीच धर्म खरा l
माणूस म्हणून ll
— पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam_Jagtap
Khup chan
Khup chann Poonam….
Tula khup Shubhechyaa….
Sunder👌👌👌❤
अत्यंत सुंदर mam
खूप सुंदर मांडणी .
वास्तव लिखाण 👌
Speiciay last 2 lines 👌
खूप सुंदर मांडणी .
वास्तव लिखाण 👌
Speiciay last 2 lines 👌
Khup sundar 👌👌
खूप छान😇👌👌
👌👌nyc ma'am
खूप छान👌👌
mast mam nice lines..✌🏻
Nice👌👌
खुप चान …😊👌
True fact & Reality of life
True fact & Reality of life
खूप छान 👌
Nice
मस्त..👌👌
अप्रतिम सुरेख , माणुसकी हा एकमात्र घटक आहे , जो माणूस ला माणूस बनवतो ।।
सुंदर ।।
👌❤😜
ना जाणिले कोणी याला | क्रूर तेला उरला ना थारा |
जगात हा कल्लोळ सारा | माणूस म्हणुनी स्थिरावेना कोणाचा पारा😃
खूप मस्त मॅडम👌👌😃
पूनम, वा:ह ,छान विचार गर्भ कविता लिहिली आहेस, कवितेतून व्यक्त केलेले विचार जर स्वत: कडून पाळले गेले नाहीत तर दांभिकतेचा दोष शिरावर घ्यायला लागेल.