संघर्षगाथा मराठी कविता | Story of Struggle Marathi Poem

संघर्षगाथा मराठी कविता |Story of Struggle Marathi Poem

दिशाहीन आयुष्याला
जगणे जेव्हा अर्थ देते…
इच्छेच्या उदरातून
स्वप्न तेव्हा जन्म घेते…
स्वप्नांवर सुरुवातीस
विश्वास नाही ठेवणार कुणी…
तुला वेड्यात काढायलाही
मागे नाही सरणार कुणी…
हसण्यावारी घे चेष्टा
पण निश्‍चय मनात कर ठाम…
हक्काचा क्षण आणण्यासाठी
कर रात्रंदिवस काम…
अपुऱ्या गरजा संघर्षाची
देत राहतील कायम प्रेरणा…
परिश्रम, जिद्द, चिकाटीने
दृढ होईल यशाची धारणा…
परीक्षा होईल पावलोपावली
बांध खुणगाठ मनात पक्की…
त्यातूनही तू तरुन जाशील
विश्वास मनी हा ठेव नक्की…
अवहेलना अन बदनामी
रडवेल तुला काही क्षण…
पण सिद्ध स्वतः ला करण्यासाठी
खंबीर बनत जाईल मन…
अपयश खचवू पाहिल तुला
पण जिद्द अजून पेटू दे…
यश मिळेपर्यंत तुला
लढण्याची ऊर्जा भेटू दे…
सरावाने वाढेल विश्वास
चुकांमधून शिकत जाशील…
तुला समजणारही नाही, की
तू कधी स्वप्नांशी एकरूप होशील…
यशापूर्वी पाहिली जाते
खुपदा कसोटी संयमाची…
द्यायला शिकावे दोषांना
वागणूक नेहमी दुय्यमाची…
यशासाठी लागतो गाळावा
कठोर मेहनतीचा घाम…
काळ करतो वेळेवर
योग्य त्याचं काम…
आज नाही तर उद्या
यशाचं तेज नक्की खुलतं…
हसणारं जगचं तुम्हाला
मग आदर्शाच्या तराजूत तोलतं…
जशा शोधू तशा मग
मिळत जातात योग्य वाटा…
बघता बघता घडत जाते
आयुष्याची संघर्षगाथा…
— पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam_Jagtap

0 thoughts on “संघर्षगाथा मराठी कविता | Story of Struggle Marathi Poem”

  1. Practical experience gives us strong leadership skills to achieve respective goals. So,
    we should deal strongly with current situation ultimately results will appear… I.e will be your goal express

    Reply
  2. हॅलो खूप सुंदर पुनम. तुझे जगतेस ते तुझ्या लेखणीतून प्रकट झालेला आहे. लिहित रहा नक्कीच वाचतांना बळ मिळेल. तुझ्या कवितेतून खूप काही घेण्यासारखं आहे. महालात लोळत पडणाऱ्यांना कष्ट काय असतं ते कळत नाही सर्व गोष्टी आता पायाशी असतानासुद्धा करमत नाही दिवस कसा घालवावा हे सुचत नाही. खरच तुझा खूप अभिमान आहे मला

    Reply

Leave a Comment