मळभ मराठी कविता | Malabh Marathi Poem
आसवांच्या मागे
दिसे स्वप्न भोळे…
पापणी मिटे ती
वाचताच डोळे…
वाहताना वाटे
काही उरले ना पाठी…
रिती भावना ती
कोरड्याशा ओठी…
सरता मळभ
लकाके ती कांती…
जुमानी न वार्या
लाभता मना शांती…
— पूनम जगताप
©Poonam Jagtap
Khup chhan