वारी मराठी कविता | Wari Marathi Poem
दरसाल येते l
पंढरीची वारी l
भक्तीचे उधाण l
पहावया ll
कितीजण देवा l
भजती मनाने l
कधी पडे न हे कोडे l
सोडवाया ll
भक्तांचा महापूर l
भक्तीचा गहिवर l
वाटो न क्षणिक l
देवराया ll
देव न रहावा l
फक्त मूर्ती देवालयी l
देहादेही तो दिसावा l
माणसाला ll
संस्कृती जपावी l
न फक्त सणावारी l
मनोमनी ती रुजावी l
बहराया ll
शोधले जरी तुला l
मनाच्या माहेरी l
देह होईल पंढरी l
विठुराया ll
—पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam Jagtap