विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

आत्म्याचे स्वामित्व
देह रथासमान…
सारथ्य बुद्धीचे
मना हाती लगाम…

दशेंन्द्रिय संयमी
रामचंद्र दाशरथी…
दशग्रंथ मुखोद्गत
दशाननाची पंडिती…

ज्ञान साधना तपे
साधकाला गर्वबाधा…
अहंकाराचे शमन
राजारामे रावणवधा…

नीच प्रवृत्ती दमन
असुरी वृत्तींवरी जय…
ज्ञानार्जने मार्ग सोपा
विनम्र साधना आशय…

मर्यादा मानवाच्या
सिमोल्लंघन तयाचे…
ज्ञानसुवर्ण प्राप्ती
सार दशमी विजयाचे…

आत्मउद्धाराचे ज्ञान
आत्मजागृतीचे मूळ…
होई साजरा दसरा
साधका साधनेचे फळ…
– पूनम जगताप
©Poonam Jagtap

1 thought on “विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा”

Leave a Comment