करावे ते सर्वकाही मराठी कविता

करावे ते सर्वकाही मराठी कविता 

सोडू नये तो हात
जो मदतीला धावतो…
सोडू नये ती साथ
जिथे विश्वास पावतो…
टिपावा तो क्षण
जो मनाला भावतो…
जपावी ती आठवण
ज्यात आनंद मावतो…
तोडू नये ते मन
जे तुम्हासाठी झुरते…
तुमच्या सुखासाठी
दिवसरात्र मरते…
सोडावा तो हट्ट
जो अधोगती दावतो…
मोडावी ती सवय
जिने तोटा वाढतो…
घ्यावी ती जोखिम
जिने अनुभव वाढतो…
राहावे तिथे ठाम
जिथे निश्चयाने लढतो…
करावे ते सर्वकाही
ज्यात समाधान मिळते…
शिकावे ते शहाणपण
जे अनुभवातून कळते…
          —पूनम जगताप
©Poonam Jagtap

Leave a Comment