पहिला पाऊस मराठी कविता | First Rain Marathi Poem

पहिला पाऊस कविता मराठी |Poem on rain in Marathi

आभाळ रितं करून
बरसून तो घेतो…
पहिला पाऊस नेहमीच
थोडसं सुखावून जातो…
मातीच्या सुगंधाला
तोड ना कशाची…
जलधारांनी तृप्त होई
धरणी ही उपाशी…
चराचर वर्षावात
आनंदाने न्हातं…
सूर्यकिरणांच्या आडून
इंद्रधनुष्य पाहतं…
तारांबळ उडाली तरी
भिजण्याची मजा न्यारी…
कागदी होड्यांना
डबक्यांची सफर भारी…
थंड थंड वातावरणात
कडक गरम चहा…
चमचमीत भज्यांची
जादुई चव अहाहा…
ओसरणार्‍या सरींसोबत
आठवणींना पूराचा वेग …
डोळ्यांच्या कडा पाणावतो
पहिल्या पावसाचा आवेग …
           —पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam_Jagtap
Related search: rain poem in marathi, shortrain poem in marathi for std 5, rain poem in marathi language, rain kavita in marathi, school rain poem in marathi, rain related poem in marathi, rain poems marathi images, poem on rain in marathi for class 6, 

0 thoughts on “पहिला पाऊस मराठी कविता | First Rain Marathi Poem”

Leave a Comment