मनोवेध मराठी कविता | Manovedh Marathi Poem
काळासोबत बदलत जाते
आपली जीवनशैली…
तणावापुढे झिजत जाते
आरोग्याची थैली…
शिक्षणामुळे येऊ लागतं
जगण्याचं भान…
तारेवरची कसरत करता
वाढत जातो ताण…
जगण्याच्या या स्पर्धेमध्ये
टिकण्याची चुरस…
जिंकण्यासाठी वाटे मग
व्हावे सगळ्यात सरस…
दबावापुढे निर्णयक्षमता
पडू लागते फिकी…
मनालाही ग्रासते मग
अपयशाची भीती…
प्रतिकूलता अन् संकटं
करून सोडतात फार बेजार…
सुदृढ शरीर व खंबीर मन
हाच खरा आधार…
आत्महत्येच्या विचारांची
वाढते जेव्हा धग…
सकारात्मकताच तारणहार
धरते आयुष्यही तग…
घ्यायला हवी समजून
आपण सुसंवादाची गरज…
मैत्रीपूर्ण सोबतीने
फुलेल आयुष्य हे नीरस…
देहामधील चेतनेला
विसरून कसं चालेल…
मनोबुद्धि समन्वयानेच
खरं व्यक्तिमत्व खुलेल…
शरीरासोबत मनाचीही
घ्यावी खरी काळजी…
कलियुगाची गरज ती
न राहावे निष्काळजी…
उधळून द्यावा ताणतणाव
करून विचार सारासार…
अमूल्य जीवनज्योती ही
न मिळे वारंवार…
मनोबले या देहाला
मिळते नवी दृष्टी…
नव्याने सुंदर दिसू लागते
तीच जुनी सृष्टी…
समाधाने जगता हरेक क्षण
होईल अजून सुरेख…
अशक्य न दिसे काही
घेता अचूक मनोवेध…
—पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam_jagtap
Chan
Very good 👍👍
मनोवेध या कवितेत खरोखरंच मनाला वेधुन असे टाकणारे शब्द वापरले आहेत.पुनम तुझे खुप खुप धन्यवाद ….संवाद,माणुस आणि मनोवेध या तीनही कविता खुप छाऩ आहेत.
अभिनंदन
पुनम जगताप
वा पुनम
खूप छान कविता लिहीलीस
अप्रतिम
सकारात्मकता वाढविण्यासाठी आणि सध्याच्या कठीण परिस्थितीत योग्य असणारी कविता आहे
👍👍 khup sundar ahe …
I must say u r really rich in Marathi vocabulary……
Perfect reflection of life
Perfect reflection of life
Excellent poonam
😍☺
🤩🤩👌👌👌👌
आजची खरी गरज आहे छान आहे
khup chan mam 👍🏻👍🏻😍
खूप छान
Good
खूप छान,👌👌
खूप सुंदर👌👌
👌👌👌👌