कोळी मराठी कविता | Spider Marathi Poem
जगाची या फिकीर कुणाला
माझेच जाळे विणतो मी…
गुंतलो जरी जाळ्यात माझ्या
गुंत्यातले सुख भोगतो मी…
अतूट माझी अशी चिकाटी
वाऱ्यालाही खाली झुकवतो मी…
वार्याच्या त्या वेगा पुढती
जाळ्याला माझ्या टिकवतो मी…
जाळे विणता भिरभिर माझी
गोल जाळ्यासवे फिरतो मी…
विणून होता जाळे पूर्ण ते
मध्यात एकटा स्थिर उरतो मी…
— पूनम जगताप
©Poonam_jagtap
कोळी विनतो जाळी..
वाटण्यास ती भोळी..
फसतो त्या मध्ये तो मी..
ज्याला असते अहम हमी..
खूपच छान 👌