जागतिक काव्यदिन मराठी कविता l World Poetry Day Marathi Poem
शब्दालंकारांचा साज लेवूनी
भावार्थाने कविता सजते…
उगमस्थान हे निमित्त केवळ
रसिकांच्या ती मनात रुजते…
भाव तिचे भिडता मनाला
आपुलकीची नाळही जुळते…
जरी न जुळले यमक तरीही
समजून घेण्या कारण मिळते…
लयीत तिच्या हरवून जाता
नवा कुठूनसा सूर गवसतो…
काव्यकलेची जादूगिरी ही
कवितेत स्वतःला शोधत बसतो…
— पूनम ज्ञानेश्वर जगताप
जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
©Poonam Jagtap